कोपरगावताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना साडेपाच लाखांचे पॅकेज संजीवनीच्या ११ विद्यार्थ्यांची निवड : विविध कंपन्यांनी दिले नियुक्तीपत्र

Ahmednagar news : कोपरगाव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलीकडेच चार नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत अभियांत्रिकी शाखेच्या ११ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली असून,

त्यापैकी चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाख व सात विद्यार्थ्यांना साडेपाच लाख वार्षिक पॅकेजचे नेमणूकपत्र दिले आहे अलीकडेच फोरसिया टेक सेंटर या कंपनीने धनश्री काळे, सिमरन सय्यद, आकांक्षा कोळपे यांची वार्षिक साडेपाच लाख पॅकेजवर निवड केली आहे. जॉनसन कंट्रोल्स प्रा लि. या कंपनीने साक्षी भडकवाडे,

सोनिया पवार, कुणाल शर्मा व जगदीश शिंदे यांची साडेपाच लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. फ्युजनस्टॅक टेक्नॉलॉजीज कंपनीने अजय बोर्डे याची वार्षिक पाच लाख पॅकेजवर निवड केली आहे. जेएनके इंडिया प्रा. लि. कंपनीने ऋतुजा शिंदे,

श्रीकांत जेजूरकर व देवाशिष पाठक यांची पाच लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकूर व ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके यांचे कौतुक केले.

माझी निवड फोरसिया कंपनीमध्ये झाली आहे. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट डिपार्टमेंटने मुलाखती घेतल्या आणि माझी निवड झाली. माझे वडील शेतकरी असून, त्यांची मी स्वतःच्या पायावर उभी राहावी, अशी इच्छा होती. माझ्या कुटुंबात मागील पिढ्यांचा विचार केला तर नोकरी करणारी मी पहिली मुलगी ठरले आहे. -आकांक्षा कोळपे, विद्यार्थिनी

‘माझी जॉनसन कंट्रोल्स या ऑटोमेशन कंपनीमध्ये निवड झाली आहे. नाशिकच्या एक ऑटोमेशन कंपनीमध्ये केलेल्या इंटर्नशिपचा माझ्या निवडीसाठी खूप उपयोग झाला. तसेच ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट डिपार्टमेंटने राबविलेल्या कॅम्पस मुलाखतीमुळे माझी सहज निवड झाली. – सोनिया पवार

Related Articles

Leave a Reply

Back to top button