ताज्या बातम्या

Patanjali Foods OFS : पतंजली फूड्सची 2 दिवसांसाठी बंपर ऑफर ! शेअर्सवर मिळणार 18% डिस्काउंट, लगेच करा गुंतवणूक…

पतंजली फूड्सने बुधवार, 12 जुलै रोजी दोन दिवसांसाठी ऑफर-फॉर-सेल (OFS) लॉन्च करण्याची घोषणा केली. या ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक त्यांचे 9 टक्के हिस्सेदारी विकतील.

Patanjali Foods OFS : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली फूड्सने बुधवारी, 12 जुलै रोजी दोन दिवसांसाठी ऑफर-फॉर-सेल (OFS) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

या ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक त्यांचे 9 टक्के हिस्सेदारी विकतील. विशेष बाब म्हणजे हा स्टेक 1,000 रुपये प्रति शेअर या भावाने विकला जाईल, जो सध्याच्या बाजारभावापेक्षा 18.36 टक्के कमी आहे.

म्हणजेच गुंतवणूकदारांना येथे पतंजली फूड्सचे शेअर्स बाजारापेक्षा स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळेल. पतंजली फूड्सचा शेअर बुधवारी बीएसईवर 1,225 रुपयांवर बंद झाला आहे.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की तिचे प्रवर्तक पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचे सुमारे 25,339,640 इक्विटी शेअर्स प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्यासह विकण्याची तयारी करत आहे. हे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या सुमारे 7 टक्के आहे.

याशिवाय, ओव्हर-सबस्क्रिप्शन झाल्यास 7,239,897 अतिरिक्त शेअर्सची विक्री करण्याची ऑफर देखील आहे, जे कंपनीच्या एकूण भांडवलाच्या सुमारे 2 टक्के आहे. अशा प्रकारे, प्रवर्तकांनी आणलेली ही OFS एकूण 32,579,537 समभाग (9%) इतकी असू शकते.

कंपनी OFS का आणत आहे?

30 जूनपर्यंत, पतंजली आयुर्वेदचा पतंजली फूड्समध्ये 39.37 टक्के हिस्सा होता. एकंदरीत, प्रवर्तक गटाकडे 29,25,76,299 शेअर्स किंवा कंपनीचे 80.82 टक्के भागभांडवल आहे, जे नियमांपेक्षा जास्त आहे.

नियमांनुसार, स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्यांमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी जास्तीत जास्त 75 टक्के असू शकते. पतंजली फूड्सने माहिती दिली की प्रवर्तकाने किमान शेअरहोल्डिंग नियमांचे निकष पूर्ण करण्यासाठी हे OFS आणले आहे.

किरकोळ गुंतवणूकदार 14 जुलै रोजी बोली लावू शकतील

पतंजली फूड्सचे OFS 13 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजवर वेगळ्या ट्रेडिंग विंडोमध्ये उघडतील. पहिल्या दिवशी म्हणजे 13 जुलैला, फक्त बिगर किरकोळ गुंतवणूकदार त्यासाठी बोली लावू शकतात. आणि 14 जुलै रोजी, फक्त किरकोळ गुंतवणूकदारांना या समभागांसाठी बोली लावण्याची परवानगी असेल.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button