अक्षय तृतीयाचे दिवशी वडिलांचे पित्र जेवू घालण्यासाठी आला अन् पोलिसांच्या बेडीत अडकला

ढाकणेवस्ती (शेवगाव) येथे राहणारे सूर्यभान मोहन ढाकणे आणि सुधाकर पुंजाराम ढाकणे यांच्यात शेतातील पाणी वाटपाचे कारणावरून वाद होत होते.
सुधाकर याने या वादातून 21 डिसेंबर 1998 रोजी सूर्यभान यास चाकुने वार करून जखमी केले होते. जखमी सूर्यभान यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांचे उपचारा दरम्यान अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. या गुन्ह्यात खुनाचे वाढील कलम लावण्यात आले होते.
शेतातील पाणी वाटपावरून 22 वर्षापूर्वी खून करणारा सुधाकर पुंजाराम ढाकणे (वय 55 रा. ढाकणे वस्ती, शेवगााव) यास न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली होती.
शिक्षा भोगत असताना गेल्या आठ वर्षांपासून तो फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला. तो अक्षयतृतीये सणासाठी आला असता, त्यास पथकाने जेरबंद केले.
सुधाकर याने शिक्षेविरूध्द औरंगाबाद खंडपीठात आपिल दाखल केले होते. खंडपीठात 28 जुलै 2014 रोजी आपिलात जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती.
तो तेव्हापासून फरार होता. उच्च न्यायालयाने आरोपीचा शोध घेण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिला होता. पोलीस निरीक्षक अनिल कटके विशेष पथकाची स्थापना केली होती.
आरोपीचे मूळ गावी शेवगाव येथे जाऊन माहिती घेतली असताना तो पुणे किंवा मुंबई येथे राहत आहे. तो वारंवार वास्तव्याचे टिकाणे बदलून राहतो, अशी माहिती मिळाली.
खबर्याकडून माहिती मिळाली की, तो अक्षय तृतीयाचे दिवशी वडिलांचे पित्र जेवू घालणे करिता आलेला आहे. परंतु, तो घरात थांबत नसून शेतात लपवून राहत आहे.
अक्षय तृतीयेचा कार्यक्रम होताच पळून जाण्याच्या तयारीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शेतात लपलेल्या अवस्थेत पकडले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, दत्तात्रय गव्हाणे, फकीर शेख, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.