लेटेस्ट

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, किंमत जाणून घ्या…

देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचं काही नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 28 पैशांनी महागले आहे.

दरम्यान या दरवाढीसह राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 98.81 रुपये प्रतिलिटर तर डिझेलची किंमत 89.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा दर 104.90 रुपये असून डिझेलचा दर हा 96.73 रुपये इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. तरी देशांतर्गत बाजारात तेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. 4 मेपासून आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 32 वेळा वाढ झाली आहे.

देशातील सर्व शहरांचा विचार करता, भोपाळमध्ये पेट्रोलचे दर हे सर्वाधिक आहेत. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर हा 107.07 रुपये असून डिझेलचा दर हा 97.93 रुपये इतका आहे. तर डिझेलचा सर्वाधिक दर देशात जयपूरमध्ये आहे. जयपूरमध्ये डिझेल 98.29 रुपये प्रतिलिटर एवढं आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पेट्रोलियम उत्पादक देशांमध्ये कच्च्या तेलाची कमी किंमत असूनही एका षडयंत्रांतर्गत पेट्रोल आणि डिझेल जास्त किंमतीला विकल्या गेल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार तमन्ना हाशमी यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button