आर्थिक

Petrol Diesel Price: सर्वसामान्यांना मिळणार दिलासा ! सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरांबाबत घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

वाढते पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो.

Advertisement

Petrol Diesel Price: देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य लोकांना खूप आर्थिक फटका बसत आहे. मात्र आता सरकार याबाबत निर्णय घेऊन पेट्रोल डिझेलच्या दरांत बदल करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यावर मात करण्यासाठी सरकार लवकरच काही पावले उचलू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होऊ शकते. भारत सरकार यावर काम करत आहे. यामध्ये विविध मंत्रालयांच्या अर्थसंकल्पातून सुमारे एक लाख कोटी रुपयांची पुनर्वाटप करण्यात येणार आहे.

अन्न आणि इंधनाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हा पैसा वापरला जाईल. सरकारच्या तुटीच्या उद्दिष्टावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने हे फेरवाटप होईल. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यामध्ये स्थानिक गॅसोलीन विक्रीवरील कर कमी करणे आणि खाद्यतेल आणि गव्हावरील आयात शुल्क कमी करणे समाविष्ट आहे. पेट्रोलवरील कर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

Advertisement

या शहरांमध्ये दर किती बदलले?

– नोएडामध्ये पेट्रोल 9679 रुपये आणि डिझेल 89.96रुपये प्रति लिटर झाले आहे.
– गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
– पाटण्यात पेट्रोल 107.27 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दर दररोज बदलतात

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल डिझेल इतके महाग खरेदी करावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button