आर्थिक

Petrol- Diesel Price : स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले ! जाणून घ्या कमी झाले की वाढले…

आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

Petrol- Diesel Price : देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमतींचा विचार केला तर लोकांच्या किशाला चांगलीच कात्री बसत आहे.

अशा वेळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात.

आज गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल 70 पैसे स्वस्त विकले जात आहे. तर महाराष्ट्रात पेट्रोल 49 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी स्वस्त झालं आहे. तसेच झारखंडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होत आहे.

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी महागलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी वाढले आहे. आणि बिहारमध्येही पेट्रोल 33 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये दर किती बदलले?

– नोएडामध्ये पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
– लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
– पाटणामध्ये पेट्रोल 108.12 रुपये आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर झाले आहे.
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही इथे आजचे दर तपासू शकता

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPrice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button