ताज्या बातम्या

Petrol Price Rs 15 : गडकरींची घोषणा..! पेट्रोल 15 रुपये लिटरने मिळेल, शेतकऱ्यांच्या घरात 16 लाख कोटी येतील; जाणून घ्या हे शक्य आहे का…

आता 100 रुपये लिटरच्या आसपास विकले जाणारे पेट्रोल 15 रुपये लिटरने मिळू शकते. सरकारचे एक उद्दिष्ट पूर्ण झाले तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. असे गडकरी म्हणतात.

Petrol Price Rs 15 : देशात वाढत्या महागाईला आला घालण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन घोषणा केली आहे. गडकरी यांनी केलेल्या या विधानाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता 100 रुपये लिटरच्या आसपास विकले जाणारे पेट्रोल 15 रुपये लिटरने मिळू शकते. असे विधान केले आहे. तसेच सरकारचे एक उद्दिष्ट पूर्ण झाले तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली येतील, असा दावा गडकरी यांनी केला आहे.

राजस्थानमधील प्रतापगड येथे एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री म्हणाले की, 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रति लीटर होईल.

याचा थेट फायदा जनतेला होणार आहे. यासोबतच प्रदूषण आणि आयातही मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या आपण सुमारे 16 लाख कोटी रुपये आयातीवर खर्च करत आहोत. हा पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांच्या घरी जाईल असे गडकरी म्हणाले आहेत.

शेतकरी अन्नदाता आणि ऊर्जादाता बनतील

गडकरी म्हणाले की, सध्या देशातील शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले जाते, मात्र आमचे सरकार त्यांना ऊर्जा देणारे बनविण्याच्या योजनेवर काम करत आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार केले जात आहे.

आतापर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. आम्ही हळूहळू त्यात वाढ करू, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांची मागणीही वाढेल.

यावेळी गडकरींनी राजस्थानमधील प्रतापगडमध्ये 5600 कोटी रुपयांचे 11 महामार्ग प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. यापैकी प्रत्येकी 219 किमी लांबीचे 4 राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी 3,775 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

फतेहनगरजवळील राष्ट्रीय महामार्ग 162A वर 4 लेनचा रेल्वे ओव्हरब्रिजही बांधला जात आहे. यामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल. याशिवाय चंबळ नदीवर एका उच्चस्तरीय पुलाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. याद्वारे राजस्थानमधील करौली ते मध्य प्रदेशातील सबलगढपर्यंत कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. आतापर्यंत ही वाट नदीमार्गे पार केली जात होती.

इथेनॉलमुळे क्रांती कशी होईल?

हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे, जो उसासारख्या साखर पिकापासून मिळतो. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून त्याचा इंधन म्हणून वापर करता येतो. आज जगातील अनेक देश इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करत आहेत.

यामुळे हळूहळू पेट्रोल आणि डिझेलसारख्या जैवइंधनांवरील अवलंबित्व कमी होईल. त्यात कार्बन कमी असल्याने ते पर्यावरणासाठीही अतिशय सुरक्षित असेल. तसेच ब्राझील सारख्या देशात वाहने 100% इथेनॉलवर चालतात.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button