अहमदनगर

पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक 10 लाख घेवून पळाला; पोलिसांनी पकडला

अहमदनगर- सावेडीतील दीपक पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय 38 रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) याच्याकडे बँकेमध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंबरनाथ (ता. कल्याण) येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

 

सावेडीतील दीपक पेट्रोल पंपावर ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा कामाला होता. त्याने 19 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोख रक्कम नऊ लाख 97 हजार 384 व कामगारांचे पगाराचे रोख रक्कम 40 हजार रूपये असा एकूण 10 लाख 37 हजार 384 रूपये रोख रक्कमेचा भरणा बँकेत केला नाही. स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता रक्कम परस्पर घेऊन गेला होता. या घटनेबाबत अनिल भोलानाथ जोशी (रा. मेघराज कॉलनी, सहकारनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विश्वासघाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

स्थानिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, ऑगस्टीन गोन्सालविस हा अंबरनाथ (ता. कल्याण) येथे त्याच्या नातेवाईकांकडे राहत आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबरनाथ येथे जावून ऑगस्टीन यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून दोन लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button