PF Interest Rate : मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! EPF वरील व्याजदरात केली वाढ, खात्यात येणार इतके पैसे
मोदी सरकारकडून पीएफ खातेधारकांना मोठी भेट देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील ठेवीवर व्याजदर वाढवण्यात आले आहे. तसेच आजपासून कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेचे व्याज खात्यात जमा करण्यास देखील सुरुवात केली आहे.

PF Interest Rate : केंद्र सरकारकडून EPF खातेधारकांना मोठी भेट दिली आहे. त्यामुळे EPF खातेधारकांना आता त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेवर अधिक पैसे मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या ठेवीवरील व्याजदरात सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत ठेवींवर 8.15 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या EPF मधील ठेवीवर व्याजदर वाढीस मंजुरी दिली आहे. EPFO ने 28 मार्च 2023 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर 2022-23 साठी 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. आज २४ जुलै २०२३ रोजी याबाबत सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे.
खात्यांवर पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली
EPFO कडून पीएफ खातेधारकांच्या खात्यात वाढीव व्याजदराची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात आता 8.15 टक्के दराने ईपीएफवरील व्याज जमा केले जाणार आहे. आता EPFO ची प्रादेशिक कार्यालये इंटरनेटद्वारे ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करतील.
ईपीएफ कोण जमा करतो?
खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा केले जातात. पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या योजेनचा मोठा फायदा देखील होत आहे.
सरकारकडून पीएफ खातेधारकांच्या ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या खातेधारकाच्या खात्यात १ लाख रुपये असतील अशा खातेधारकाला 8,150 रुपये व्याज मिळणार आहे. जर तुमच्या खात्यात 3 लाख रुपये जमा असतील, तर तुम्हाला 8.15% दराने 24 हजार 450 रुपये व्याज मिळेल.
सरकारकडून पीएफ ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यात आल्यानंतर त्याचा फायदा 6 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी देखील ही चांगली बातमी आहे.