पिकअप-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

अहमदनगर- पिकअप-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. नगर-पाथर्डी महामार्गावरील देवराई (ता. पाथर्डी) गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली.
सविस्तर माहिती अशी की, नगर-पाथर्डी महामार्गाचे काम चालु आहे. या रस्त्यावरील देवराई गावाजवळ रविवारी सायंकाळी तिसगावच्या दिशेने चाललेली पिकअप आणि समोरुन तिसगाववरुन येणार्या दुचाकी यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली.
या अपघातात दुचाकी वरील सुनिल भरत बर्डे (वय 21 रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश बाळासाहेब जाधव (वय 19 रा. कौडगाव ता. पाथर्डी) हा तरुण गंभीर जखमी झाला. पिकअपच्या चालक मालकाचे नाव समजु शकले नाही. समोरासमोर झालेल्या या अपघातात पल्सर दुचाकीचे मोठे नुकसान झाले तर पिकअप गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली.