आर्थिक

PM Kisan Update : शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पीएम किसानचा 15 व्या हप्त्यापूर्वी झाला मोठा बदल, लाभ मिळवण्यासाठी ‘हे’ काम आजच करा…

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी ही खास योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

PM Kisan Update : सध्या देशात लाखो शेतकरी पीएम किसानचा 15 व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हफ्ते जमा झालेले आहेत. जे आता 15 वा हफ्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येणार आहे. मात्र आता ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला. म्हणजेच हा हप्ता ऑक्टोबरमध्ये सोडला जाण्याची शक्यता आहे.

तसेच 14वा हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला होता. या वेळी 14 वा हप्ता म्हणून पीएम मोदींनी 8.11 कोटी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना 2000-2000 रुपये दिले होते.

तर आजच्या तारखेत, एप्रिल-जुलै 2023 चा हप्ता 9.53 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचले आहेत. पीएम किसान पोर्टलवर या योजनेत सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

मात्र या योजनेचा जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना अद्याप हप्ता मिळालेला नाही. तसेच आता येणार 15 वा हप्ताही या शेतकऱ्यांना मिळणार नाही, ज्यांचे भुलेख मार्किंग, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि पीएम किसान पोर्टलवर ईकेवायसीचे काम पूर्ण झालेले नाही.

शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात न येण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये आधार कार्ड, पीएम किसान पोर्टल आणि बँक खात्यातील लाभार्थीच्या नावाचे स्पेलिंग. अशा चुका. त्यामुळे जर तुमचाही आधीच हफ्ता रखडला असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. येथे लाभार्थी आधारनुसार स्वतःच्या नावात दुरुस्ती करू शकतो. तसेच नाव दुरुस्ती कशी करायची ते तुम्ही जाणून घ्या.

स्टेप -1: सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.

स्टेप-2: येथे फार्मर्स कॉर्नरवर, तिसर्‍या रांगेत, Name Correction as per Aadhaar यावर टॅप करा किंवा क्लिक करा.

स्टेप-3: यानंतर एक नवीन विंडो उघडेल. येथे नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तुम्हाला माहीत नसेल तर काळजी करू नका. निळ्या पट्टीवर क्लिक करा जिथे तुमचा Know Your Registration Number असे लिहिले आहे,

स्टेप-4: तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा. यानंतर कॅप्चा कोड टाका आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि नेमलेल्या ठिकाणी OTP टाका. यानंतर सबमिट वर क्लिक करा. तुमचा पीके शेतकरी नोंदणी क्रमांक तुमच्या समोर असेल.

स्टेप 5: नंतर पुन्हा स्टेप-3 वर जा आणि नोंदणी क्रमांक कॅप्चा कोड टाकून शोधा. नाव जुळत नसल्यास, सूचनांचे अनुसरण करा आणि सबमिट करा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button