आरोग्य

Poha Benefits : नाश्त्यामध्ये पोहे का खावेत? जाणून घ्या वजन कमी करण्यासोबतच पोह्याचे जबरदस्त फायदे

लोक सर्वात जास्त नाश्त्यामध्ये पोहे खात असतात. पोहे खाल्य्याने शरीराला अनेक महत्वाचे घटक मिळत असतात. ज्यामध्ये शरीरात खूप वेळ ऊर्जा राहते.

Poha Benefits : भारतात नाश्त्यामध्ये सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे पोहे आहेत. बनवायला सोप्पे व वेळेची बचत आणि चवीला चांगले असणारे पोहे लोक मोठ्या प्रमाणात नाश्त्यामध्ये खात असतात.

मात्र तुम्ही फक्त पोह्याकडे सकाळचा नाष्टा म्ह्णून पाहत असता. मात्र आज आम्ही तुम्हाला पोहे खाण्याचे अप्रतिम फायदे सांगणार आहे. तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासोबतच याचे सेवन वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे.

यामध्ये कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात आढळते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे देखील असतात. लोकांना ते सकाळी खाण्यासही आवडते कारण ते सहज पचते.

पोहे खाण्याचे फायदे

रोज नाश्त्यात पोहे खाणे खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमचा दिवसभर ताजेपणा राहतो आणि तुमची पचनक्रिया चांगली राहते. जर तुम्ही नाश्त्यात सोयाबीन, ड्रायफ्रुट्स आणि अंडी मिसळून खाल्ले तर तुम्हाला जीवनसत्त्वांसोबत प्रोटीनही मिळते.

शरीराला लोह मिळते.

जो व्यक्ती नियमितपणे एक प्लेट पोहे खातो त्याला लोहाची कमतरता जाणवत नाही आणि अॅनिमियापासून दूर राहते. हे खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लोह शरीराच्या पेशींना ऑक्सिजन पुरवतो.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. मधुमेही व्यक्तीसाठी पोहे खाल्ल्याने भूक कमी होते आणि बीपीची पातळी नियंत्रणात राहते. एका प्लेट पोह्यात २४४ किलो कॅलरी असतात.

न्यूट्रिएंट्स अधिक प्रमाणात

अनेकदा घरांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मिसळून पोहे तयार केले जातात. पोह्यातील भाज्यांचे सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळतात.

कार्बोहायड्रेटचे स्रोत

पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेटही चांगल्या प्रमाणात आढळते. कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात आणि तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. तुम्ही रोज नाश्त्यात पोहे खाऊ शकता.

तुमच्या पोटात काही समस्या असल्यास पोहे खाणे तुमच्यासाठी चांगले राहील. हे सहज पचण्याजोगे असते आणि त्यात खादाडपणाचे प्रमाणही कमी असते. डॉक्टरही पोटाच्या रुग्णांना पोहे खाण्याचा सल्ला देतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button