अवैध कत्तल खान्यावर पोलिसांची कारवाई…115 किलो गोमांस जप्त

श्रीरामपूर शहरातील कुरेशी मोहल्ला येथील अवैध कत्तलखान्यावर पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी जवळपास 16 हजार रुपये किंमतीचे 115 किलो गोमांस जप्त केले.
दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि, शहरातील कुरेशी मोहल्ला येथील अवैध कत्तलखाण्यात गोवंशीय वासरांची अवैध कत्तल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने कुरेशी मोहल्ला येथील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला.
घटना स्थळाहून पोलिसांनी अल्ताफ नसीर खान (वय 22) याचे ताब्यातून रुपये 16,100 रु. किमतीचे चे 115 किलो गोवंशीय वासरांचे मांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.