अहमदनगर

शेतकर्‍यांचे चारा कापण्याचे यंत्र चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड

शेतकर्‍यांचे चारा कापण्याचे यंत्र चोरी करणार्‍या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते.

काही दिवसांपूर्वीच चैत्यनपूर परिसरातून एका शेतकर्‍याची 20 हजार रुपये किमंतीचे मिल्कीग मशिन चोरी गेल्याची तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल झाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचार्‍यांसह जावून चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे तुषार बद्रीनाथ गवांदे, बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैतन्यपुर, ता. अकोले) यांचेकडे मिळुन आले.

त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने त्याच्या इतर साथीदारांबाबत देखील पोलिसांना माहिती दिली.

त्यावरून पोलिसांनी मयुर रामदास महाले, दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा बेलापुर, ता. अकोले) यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे,

पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पो. ना. किशोर तळपे व पो.ना. विठ्ठल शेरमाळे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button