अहमदनगर

पोलिसांची आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई; एक जण ताब्यात

पोलिसांनी आयपीएलवर सट्टा खेळविणार्‍या एकाला छापा टाकून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 25, रा. बोल्हेगाव गावठाण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यासह स्वप्नील परवते (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई गौतम नामदेव सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.

बोल्हेगाव येथील नवनाथनगरमध्ये तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. आरडेकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आरडे हा परवते याच्या सांगण्यावरून राजस्थान रॉयल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शैलेश गोमसाळे करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button