अहमदनगर

पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; एकाविरूध्द गुन्हा

मंगलगेट येथील कोंड्यामामा चौकात तोफखाना पोलिसांनी छापा टाकून दोन हजार 100 रूपये किंमतीची 21 लीटर गावठी हातभट्टी दारू पकडली.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून दारू विक्री करणारा प्रशांत रघुनाथ शिंदे (वय 29 रा. मंगलगेट) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार सलीम शेख, शिरीष तरटे यांच्या पथकाने रविवारी सव्वा पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button