अहमदनगर

धूम स्टाईल चोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी आखली विशेष मोहीम

शिर्डी शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

आता याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरातील ज्या ठिकाणी अशा धूम स्टाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या परिसरात नाकेबंदी करून मोहीम यशस्वी केली आहे.

ज्या ठिकाणी धूम स्टाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या परिसरात नाकेबंदी करून विना नंबरचे दुचाकी वाहने वाढलेले केस कानात असलेल्या बाळ्या, डोक्यावर वाढलेले केस टपोरी सारखा असलेला पेहराव त्याबरोबरच संशयित वाटेल असे दुचाकी धारक पकडण्यासाठी मोठी कारवाई सुरु आहे.

तसेच अशा व्यक्तीचे वाहनाचे कागदपत्रे लायसन्स आदींची देखील चौकशी केली जात असुन ज्याच्याकडे कागदपत्रे नाही अशा तरुणावर कारवाई देखील करण्यात आली आहे अशी माहिती शिर्डी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली अचानक कोणत्याही चौकात कुठल्याहीवेळी ही मोहीम विषेश पोलीस पथकाकडून राबविण्यात येत आहे.

त्याचा धसका देखील काही जणांनी घेतला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच संशयित गुन्हेगार पकडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जे गुन्हेगार रेकॉडवर होते त्यांच्या हालचालींवर देखील आमचे बारीक लक्ष ठेवून असुन रात्री बेरात्री देखील घरी जाऊन तो घरी आहे का बाहेर आहे याची देखील माहिती घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button