अहमदनगर

गाडीची चौकशी करणाऱ्या पोलिसाला वाहनधारकांकडून धक्काबुक्की… शिर्डीतील प्रकार

एका गाडीची चौकशी करत असलेल्या पोलिसाला वाहनधारकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डी शहरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डी पोलीस स्टेशनकडून विविध उपाययोजना व विनानंबर वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रोडवरील एका हॉटेलसमोर एक पांढरा रंग असलेली

विनानंबरची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडु मारुती गोर्डे (रा.श्रीराम नगर शिर्डी) याने गोंधळ घालून अरेरावी केली.

तसेच तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. असे म्हणत आरोपीने पोलिसाला धक्काबुक्की केली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडु गोर्डे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button