अहमदनगर

वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे; अधीक्षकांकडे साकडे

विजेचा तुटवडा यामुळे राज्यावर सध्या भारनियमनाचे संकट कोसळले आहे. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या अघोषित भारनियमन चालू आहे.

सध्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा जास्त आहे. त्यात अघोषित भारनियमनामुळे वीज उपकेंद्र व कक्ष कार्यालयात कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांच्या रोषास बळी पडावे लागते.

Advertisement

अघोषित भरनियमन हे रात्री अपरात्री होत असल्याने व उपकेंद्रात काम करणाऱ्या कर्मचऱ्यांना कोणतेही संरक्षण नसल्यामुळे कार्यालयाची तोडफोड करणे, कर्मचारी वर्गाला धमकावणे प्रसंगी मारहाण करणे या सारखे प्रकार नगर जिल्ह्यात सुरू झाले.

त्यामुळे संवेदनशील ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे, आशी मागणी वीज कामगार महासंघाचे नाशिक झोनचे संघटक प्रदीप भाटे यांनी निवेदनाद्वारे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हंटले कि, वीज टंचाई मुळे संपूर्ण राज्यात विजेचे भारनियमन सुरु असून याला सामान्य वीज कर्मचारी जबाबदार नाही. नागरिकांनी संयम राखून वीज मंडळ प्रशासनाला सहकार्य करावे व आणीबाणीच्या काळात विजेचा वापर मर्यादित करावा व आवश्यक नसेल तेव्हा वीज बंद ठेवावी.

Advertisement

वीज कर्मचारी आपले बांधव असून त्यांच्यावर हल्ले करू नका व कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान न करता सर्वांनी संयम राखा, असेही अवाहन ग्राहकांना महराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने करण्यात आले.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button