संगमनेरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; लाखोंचा माल हस्तगत

नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 1 लाख 79 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 11 जुगार्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील बोटा शिवारातील पिराच्या ओढ्या कडेला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त खबर्यामार्फत मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला.
त्याठिकाणी 11 जुगारी पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकत तेथून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. एकूण 1 लाख 79 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी नगरच्या गुन्हे शाखेच्या लक्ष्मण चिंधू खोकले यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
आत्माराम किसन सुकाळे (वय 54, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, जिल्हा पुणे), विश्वनाथ बबन कावडे (वय 43, रा. बेल्हे ता. जुन्नर, जिल्हा पुणे), नामदेव काळूराम तळपे (वय 32, रा. आळे ता. जुन्नर, जिल्हा पुणे), मारुती बबन गुंजाळ (वय 42, रा. आळे ता. जुन्नर, जिल्हा पुणे),
मिनिनाथ शशीकांत घाडगे (वय 38, रा. कांदळी ता. जुन्नर, जिल्हा पुणे), रोहित किरण शहा (वय 38, रा. ओतूर ता. जुन्नर, जिल्हा पुणे), सुनील गेनुभाऊ कुर्हाडे (वय 48, रा. आळेफाटा ता. जुन्नर, जिल्हा पुणे),
दत्तात्रय सदाशिव फापाळे (वय 32, रा. जाचकवाडी ता. अकोले, जिल्हा अहमदनगर), सय्यद नजरअली असगर (वय 48, रा. मंचर ता. आंबेगाव, जिल्हा पुणे), जितेंद्र बबन घाडगे (वय 36, रा. पिंपळवाडी ता. जुन्नर, जिल्हा पुणे), सुभाष ज्ञानदेव मुसळे (वय 40, रा. बोटा ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) अशी जुगारी आरोपींची नावे आहेत.