अहमदनगर

कल्याण मटक्यावर पोलिसांची छापेमारी

शहरात सहा ठिकाणी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईवरून कल्याण मटका शहरात खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी संबंधीत व्यक्तीविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

अहमदनगर शहरात अवैध धंदेही तेजीत सुरू झाले आहे. या धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दिवसभर छापेमारी केली.

छापे टाकले असले तरी यामध्ये पकडलेला मुद्देमाल कमी आहे. मात्र कल्याण मटका जोरात सुरू असल्याचे दिसून आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माळीवाडा वेशीजवळील निसर्ग हॉटेलच्या समोरील जागेत, आशा टॉकीज चौकातील देशपांडे हॉस्पिटलच्या शेजारी मोकळ्या जागेत व माळीवाडा बस स्थानक परिसरात दीपक वाईन्स शेजारी मोकळ्या जागेत कारवाई केली.

या प्रकरणी अमोल दिलीप भापकर (वय 25 रा. ढोरगल्ली, माळीवाडा), विकास संपत साठे (वय 48 रा. सिध्दार्थनगर), मंगेश हिरामण भोसले (वय 34 रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहे.

कोतवाली पोलिसांच्या पथकाने कायनेटीक चौकात आयुष्य चायनिजच्या जवळ, फुलसौंदर चौकात व माळीवाडा वेसीजवळ कारवाई केली.

या प्रकरणी शरद सोपान कांबळे (वय 34 रा. रेल्वेस्टेशन, गौतमनगर), जावेद इब्राहीम शेख (वय 38 रा. आशा टॉकीज चौक), मंगेश हिरामल भोसले (वय 44 रा. जाहागीर मळा) याच्याविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button