Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातील 'त्या' कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर येथील कुंटणखान्यावर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत ४ महिलांची सुटका केली.

कुंटणखान्यातील साहित्य, मोबाईल, वाहने व रोकडसह ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त करत ६ जणांवर गुन्हा दाखल केला.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मंगळवारी (६ फेब्रुवारी) मध्यरात्री ११.१५ वाजता पथकाने पोखरी-बाळेश्वर येथील कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनून पाठवले होते.

वैशाली फटांगरे, दीपक फटांगरे (पोखरी बाळेश्वर) व सोमनाथ सरोदे (आनंदवाडी, ता. संगमनेर) हे तिघे मुलींना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले.

महिलांसह ३ ग्राहकांना पथकाने ताब्यात घेतले. मुलींना व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जागा उपलब्ध करून देत होते. २०२२ मध्ये पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या कुंटणखान्यावर कारवाई केली होती. तरी देखील हा व्यवसाय सुरू आहे.

दरम्यान, पोलिस पथकाने कारवाईत ४ पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये ३ स्थानिक व एक महिला परराज्यातील आहे. त्यांची रवानगी येथील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्थेत केली.

पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वैशाली उत्तम फटांगरे (वय ४८), दीपक उत्तम फटांगरे (वय २१, पोखरी बाळेश्वर), सोमनाथ यादव सरोदे (आनंदवाडी), सागर वसंत लेंडे (वय २५, नांदूर खंदरमाळ), शुभम बाळासाहेब मतकर (वय २२, निमज, ता. संगमनेर)

व रामदास अशोक मोरे (वय २९, धुमाळवाडी रोड, अकोले) आदी ६ जणांवर स्त्रिया, मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सोमनाथ सरोदे फरार झाला. तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments