अहमदनगर

पोलीस भरती; मैदानी चाचणीला नगरमध्ये सुरूवात; अशी राबवली जाते प्रक्रिया

अहमदनगर- पोलीस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्येक्षात मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी पोलीस चालक पदासाठी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी 200 उमेदवारांनी हजेरी लावली. यातील 48 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरविण्यात आले. उर्वरित 152 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

 

सोमवार, 2 जानेवारी व आज मंगळवार, 3 जानेवारी या दोन दिवशी चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सोमवारी एकुण 388 उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. परंतू प्रत्येक्षात 200 उमेदवार हजर राहिले. यातील 48 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरविण्यात आले. स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

 

सुरूवातीला उपस्थित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर उंची, छातीचे मोजमाप करण्यात आले. यानंतर गोळा फेक व 1600 मीटर धावणेची चाचणी पार पडली. उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला. आज मंगळवार पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी होणार असून उद्या बुधवारपासून पोलीस शिपाई पदाच्या 129 जागेसाठी मैदानी चाचणीला सुरूवात होणार आहे. प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवार हजर राहणार आहे. 14 जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button