‘त्या’ पाच मुक्या जीवांची पोलिसांनी केली सुटका…!

शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तल करण्याकरीता डांबुन ठेवण्यात आलेल्या पाच गायींची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी तौसीफ शरीफ शेख ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदराने माहिती दिली की, शहरातील कसाई गल्ली झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जणावरे कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आली आहेत.
त्यानुसार पोलिस निरीक्षक शिंदे यांनी नमुद ठिकाणी छाप टाकला असता भिंतीच्या आडोशाला एक इसम बसलेला दिसला तसेच त्याच्यासमोर काही जणावरे दोरानी बांधुन ठेवलेली असल्याचे पथकास दिसली.
त्या इसमास जागीच पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तौसीफ शरीफ शेख (वय ४० वर्ष,धंदा ड्रायव्हर रा.सुभेदार गल्ली, मस्जीद जवळ झेंडीगेट अहमदनगर) असे सांगितले.
या इसमाला सदरची जनावरे ही कोणाची आहेत असे विचारले असता त्याने सांगीतले की, सदरची जनावरे ही माझ्याच मालकीची असून कत्तल करण्याकरीता घेवुन आल्याचे सांगीतले.त्यानुसार पाचजनावरांची सुटका करून ही सर्व जनावरे पांजरपोळ येथील गोशाळेत दाखल केले.