अहमदनगर

कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर अश्लील पोस्ट ! महिला कर्मचारी त्रस्त….

नगर महापालिकेचे कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायम टीकेचे लक्ष्य ठरत असतात. कर्मचार्यांच्या अंतर्गत वादामुळेही मनपात काही कर्मचारी कायम चर्चेत असतात.

आता महापालिका कर्मचाऱ्यांच्या एका ‘व्हाट्सअप ग्रुप’वर एका कर्मचार्याने टाकलेल्या अश्लिल पोस्टमुळे कर्मचारी वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. या ग्रुप मध्ये काही महिला कर्मचारी असून काही या पोस्टमुळे त्रस्त झाल्या आहेत.

महापालिकेच्या एका विभागाच्या व्हाट्सअप ग्रुपवर अनेक कर्मचारी आहेत. त्यात काही महिला कर्मचारीही आहेत. या ग्रुपवर सोमवारी दुपारच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने अश्लील स्टिकर पोस्ट केले. ग्रुप ॲडमिनने या कर्मचाऱ्याला ग्रुपमधून काढून टाकले असले, तरी या ग्रुपमधील महिला कर्मचाऱ्यांना या पोस्टमुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.

संबंधित विभागाच्या कामकाजाच्या सोयीसाठी सदरचा ग्रुप तयार करण्यात आला होता. मात्र, कामकाजाशिवाय इतर पोस्ट या ग्रुपवर वायरल होत असल्याने इतर कर्मचारीही त्रस्त असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button