Post Office : महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना ! हजारोंच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा रिटर्न…
या पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना आहेत. या योजना खास महिलांसाठी आहेत. यामध्ये गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळू शकतो.

Post Office : देशातील पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला महिला चांगला रिटर्न घेत आहेत. आज आम्ही अशाच काही योजना तुम्हाला सांगणार आहे.
जर तुम्ही नोकरी करत असाल आणि यासोबतच तुमच्या पगाराची थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही महिलांसाठी गुंतवणुकीचे 5 सर्वात सुरक्षित पर्याय आणले आहेत. विशेष म्हणजे तुम्हला यात चांगले व्याजही मिळेल. जाणून घ्या या योजना
महिला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवणूक करू शकतात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते ही दीर्घकालीन योजना आहे. PPF मध्ये मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. यावर 80C अंतर्गत सूट आहे. यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर PPF वर वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
तसे, ही योजना मुलींसाठी आहे. महिला त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने खाते उघडून सुकन्या समृद्धी योजना योजनेचा लाभ घेऊ शकतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा प्रौढ झाल्यावर खात्याची मालक बनते.
सुकन्या समृद्धी खात्यावर सध्याचा व्याजदर 7.6 टक्के आहे. एका आर्थिक वर्षात या खात्यात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीच्या श्रेणीत येते.
महिला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये गुंतवणूक करू शकतात.
तुम्ही NSC योजनेत किमान रु. 1,000 आणि त्यानंतर रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये कोणतीही उच्च मर्यादा नाही. NSC योजनेची मर्यादा 5 वर्षे आहे. यावर 7 टक्के दराने व्याज मिळते. यावर 80C अंतर्गत सूट आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा महिलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे
महिला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्येही गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. 5 वर्षांच्या ठेवींवर 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. तुम्हाला 5 वर्षांच्या ठेवीवर 7 टक्के व्याज मिळेल.
महिला बचत प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना 2 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. ही योजना मार्च 2025 पर्यंत म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुली आहे. या योजनेंतर्गत महिला किंवा मुलींच्या नावावर 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये दरवर्षी 7.5 टक्के निश्चित व्याज मिळते. जर तुम्ही यामध्ये खाते उघडले तर 1 वर्षानंतर 40 टक्के पैसे तुम्हाला तुमच्या खात्यातून काढता येतात.