Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना! दरमहा 12 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल १ कोटींचा बंपर परतावा…
तुम्हीही गुंतवणुकीसाठी पोस्टाची योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाकडून अनेक योजना सादर करण्यात आल्या आहेत. या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते.

Post Office Scheme : आजकाल अनेकजण गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. मात्र गुंतवणूक कुठे करायची हे अनेकांना माहिती नसते. तसेच गुंतवणूक करताना जर ती योग्य ठिकाणी केली नाही तर पैसे बुडण्याची देखील भीती असते.
तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला काही दिवसांत चांगला बंपर परतावा मिळवू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी पोस्टाची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सर्वोत्तम आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षात बक्कळ पैसे कमवू शकता. सरकारकडून अशा योजनांमध्ये जास्तीचे व्याजदर दिले जाते त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होत असतो.
पोस्टाची ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यावर कोणतीही जोखीम नाही. तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये सरकारकडून वेळोवेळी व्याजदर देखील वाढवले जाते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत असतो.
बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते
जर तुम्हाला सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत जाऊन खाते उघडू शकता. यासाठी तुम्ही किमान ५०० ते १.५० लाख रुपयांची वार्षिक गुंतवणूक करू शकता. या योजेनची परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे.
12500 रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही बनू शकता करोडपती
जर तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12,500 रुपये १५ वर्षे जमा केले तर तुम्हाला मुदतीनंतर 40.68 लाख रुपये दिले जातील. यामधील तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल आणि तुम्हाला या गुंतवणुकीवर 18.18 लाख रुपये व्याज दिले जाईल.
करोडोंचा बंपर नफा
जर तुम्हाला या योजनेची रक्कम १५ वर्षानंतरही काढायची नसेल तर तुम्ही ही योजना ५-५ वर्षांनी वाढवू शकता. जर तुम्ही २५ वर्षे ही योजना सुरु ठेवली तर तुम्हाला २५ वर्षानंतर 1.03 कोटी निधी दिला जाईल. तुमची एकूण गुंतवणूक 37.50 असेल आणि तुम्हाला यावर 65.58 व्याज दिले जाईल.