अहमदनगर
मित्रासोबतचे नको ते फोटो टाकले सोशल मीडियावर; युवतीची अशी केली बदनामी

अहमदनगर- नगर शहरात राहणार्या एका युवतीचे इंस्टाग्रामवरील अकाऊंट हॅक करून त्यावर मित्रासोबत असलेले फोटो पोस्ट करून युवतीची बदनामी केली. सुमारे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असून या प्रकरणी गुरूवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी युवतीचे इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. साधारण तीन महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांचे इंस्टाग्रामवरील अकाऊंट हॅक केले होते. अकाऊंट हॅक करून त्यावर फिर्यादी युवतीचे तिचा मित्रासोबत असलेले फोटो पोस्ट करून त्यावर अश्लिल मजकुर लिहून फिर्यादीची बदनामी केली.
सदरचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी गुरूवारी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल कटके करीत आहेत.