अहमदनगरताज्या बातम्या

मी राहुरीचा भाई असे म्हणत बसवर दगडफेक तरुणाचा प्रताप : एक महिला प्रवासी जखमी, गुन्हा दाखल

Ahmednagar news : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे ८ मे रोजी सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या बसला थांबवून मी इथला भाई आहे, असे म्हणून एका तरुणाने बसवर दगडफेक केली. या घटनेत एक प्रवासी महिला जखमी झाली असून,

बसचेही नुकसान झाले आहे. संदीप नारायण मोरे (वय ३४) हे दौंड आगारात एसटी बसचालक आहेत. ते ८ मे रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान बारामती ते शिर्डी बस (क्र.एमएच १४ बीटी १२२८) घेऊन निघाले होते. दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद चौकात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रवासी गाडीतून खाली उतरत असताना एक इसम मोटारसायकलवरून (क्र. एमएच १७ सी ७७१३) तेथे आली व मी येथील भाई आहे, असे म्हणून त्याने बसचालकाला शिवीगाळ करून बसवर दगडफेक केली.

तसेच येथून पुढे तुम्ही एसटी नेली तर तुमचा बेतच पाहतो, अशी धमकी दिली. इसमाने बसवर दगडफेक केल्यामुळे बसमधील महिला प्रवासी शारदा श्रीकांत नाचनेकर (वय ५० वर्षे, रा. सांताक्रूझ, मुंबई) यांना किरकोळ दुखापत झाली असून, एसटी बसचेही नुकसान झाले. बसमध्ये एकूण ५० ते ५५ प्रवासी होते.

त्यानंतर चालकाने स्थानिक लोकांना या इसमाचे नाव, गाव विचारले असता त्याचे नाव सागर उल्हारे (रा. राहुरी फॅक्टरी) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर चालक मोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी सागर उल्हारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button