अहमदनगर

प्रवीण दरेकरांनी आता आडनाव ‘दरोडेखोर’ करावे; नानांचा खोचक टोला

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांवर खोचक टीका केली आहे.

नेमके काय म्हणाले नाना पटोले? जाणून घ्या
मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विदयमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे.

बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे अशी टीका पटोले यांनी केली आहे.

मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहेत, त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते तेव्हा करेल तो भरेल असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांवर देखील डागले टीकास्त्र
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे.

सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अशी टीकाही पटोले यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button