अहमदनगर

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर ‘यांच्यावर’ होणार प्रतिबंधक कारवाई; पोलिसांनी केले नियोजन

अहमदनगर- मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुमारे 500 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी त्यादृष्टीकोणातून नियोजन सुरू केले आहेत.

 

संबंधीत व्यक्तींना नोटीसा पाठविण्यात येणार असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.

 

किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 155 व्यक्तींना सीआरपीसी 107 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत. यामध्ये कोतवाली 53, तोफखाना 62 व भिंगार कॅम्प हद्दीतील 40 व्यक्तींचा समावेश आहे.

 

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 24 गुन्हेगारांना सीआरपीसी 110 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत. त्यांच्याकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहेत. यामध्ये तोफखाना हद्दीतील 22 व भिंगार हद्दीतील दोन गुन्हेगारांचा समावेश आहे.

 

गैरवर्तन करण्याची शक्यता असणार्‍या 127 व्यक्तींना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत. यामध्ये कोतवाली हद्दीतील 22, तोफखाना हद्दीतील 45 तर भिंगार हद्दीतील 50 व्यक्तींचा समावेश आहे. मोहरम काळात गैरवर्तन केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले.

 

मोहरम मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नगर शहर हद्दीतून 175 व्यक्तींना हद्दपार करण्यात येणार आहे. त्यांना सीआरपीसी 144 (2) प्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांना मोहरम मिरवणूकीच्या वेळी हद्दीतून हद्दपार करण्यात येणार आहे. यामध्ये कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून 50, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून 45 तर भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून 80 व्यक्तींना हद्दपार केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button