लेटेस्ट
अहमदनगर जिल्ह्यातील या समितीत सोयाबीनला 5380 रुपये भाव !

बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 5380 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली. काल बाजार समितीत15 क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
कमीत कमी 5150 रुपये तर जास्तीत जास्त 5380 रुपये तर सरासरी 5265 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. मकाला 1715 रुपये, गव्हाला1876 रुपये,
बाजरी 2623 रुपये असा भाव मिळाला. कांदा तसेच डाळिंब लिलाव सोमवारपासून सुरू होणार असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले.
अश्याच अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या आणि नव नवीन अपडेट्स साठी फॉलो करा आम्हाला गुगल न्यूज वर !