Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातील ह्या तरुणाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक !

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तरुणाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक !

Ahmednagar News : पाथर्डी शहरातील युवक हर्ष गुगळे व त्याच्या टीम ने देशात विविध ठिकाणी येणाऱ्या पुराच्या संदर्भात यंत्र तयार केले असून त्याद्वारे नद्यांना येणाऱ्या पुराबाबत व त्यापासून होणाऱ्या नुकसानी बाबत धोक्याचा इशारा मिळणार आहे.

या प्रकल्पाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले असून या यशाबद्दल गुगळे व त्याच्या टीमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगुलमीटवर अभिनंदन केले आहे.

गुगळे हा शहरातील सुवर्णकार सोनू गुगळे यांचा मुलगा असून सध्या तो वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

ज्या स्पर्धेत त्याच्या टीम ने बक्षीस मिळवले त्या स्पर्धेचे आयोजन हे केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले होते.

या स्पर्धेत देशभरातील सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धेत गुगळे व त्याचे सहकारी पुष्कर लुणावत, रोहित मल्लाडे, संपदा भुस्कुटे, हर्ष शहा व विवेक गोगी यांनी सहभाग घेतला होता.

देशाच्या विविध भागात अचानक पूर येतो व त्यामध्ये मोठी हानी होते. या विषयावर या टीमने संशोधन केले असता वर्तमान स्थितीत सेंट्रल वॉटर कमिशनद्वारे पुराच्या संदर्भात जो अलर्ट दिला जातो तो गेज लेवल च्या बाबतीत दिला जात असला तरीही त्यामुळे पुरामुळे किती हानी होते याचा अंदाज येत नसल्याचे या टीमच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास करत एआयएमएल मॉडेलची निर्मिती केली.

या मॉडेलनुसार युरोपियन स्पेस एजन्सीच्या सॅटिनल वन या सॅटेलाईटचे छायाचित्र प्रोसेस करून त्याचा हायड्रोलॉजिकल पॅरामीटर्सशी संबंध काय आहे हे दाखवले व त्यामुळे पूर आला तर पाण्याचा पसारा कशा पद्धतीने प्रसारित होऊ शकतो याचे चित्र प्रदर्शित केल्याने या टीमला हे पारितोषिक देण्यात आले.

हे पारितोषिक मिळण्यापूर्वी या संघाने पूर प्रक्रिया, नदीच्या पाण्याचा वेग व प्रवाह याचा मोठा अभ्यास केला होता. त्यांनी सादर केलेल्या या प्रोजेक्टमुळे आता पुरामुळे नेमके किती नुकसान होऊ शकते

याचा अंदाज येणार आहे. या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल गुगळे याच्या टीमचे मोदी यांनी गुगलमीटवर अभिनंदन केल्याने गुगळे व त्याच्या टीमचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments