अहमदनगर

पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया ! मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो ! तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा’…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर इथली रॅली रद्द करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे.

फिरोजपूरमधील रॅली पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणामुळे रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणारं होतं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं.

इतकंच नाही तर या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधानांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते.

त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो.

मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं.

त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button