Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : ट्रकने चिरडले प्राचार्यांचा मृत्यू. अहमदनगरधील घटना

Ahmednagar News : ट्रकने चिरडले प्राचार्यांचा मृत्यू. अहमदनगरधील घटना

Ahmednagar News : अहमदनगर मधून अपघाताचे वृत्त आले आहे. ट्रकने चिरडल्याने प्राचार्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात भिंगार मध्ये शुक्रवारी (दि.२) सकाळी झाला.

भिंगार मधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थाने आणखी एकाचा बळी घेतला आहे.

रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी घसरून खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून मालट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाथर्डी कडे जाणाऱ्या रोडवर भिंगार वेशीच्या पुढे असलेल्या कमानीजवळ सकाळी ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार सुनील विजयकुमार बेरड (वय ५२, रा. शहापूर, ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे.

मयत बेरड हे आठरे पाटील पब्लिक स्कुल मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते शहापूर येथून मोपेडवर भिंगार मार्गे नगरकडे येत असताना

जिल्हा बँकेच्या शाखे समोर रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना त्यांची मोपेड घसरली व ते रस्त्यावर खाली पडले, त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या मालट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले.

हेल्मेट घातलेले असूनही अवजड मालट्रक चे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सकाळीच हा अपघात झाल्याने तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

या अपघाताने बराच वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच भिंगार कम्प पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मयत बेरड यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments