अहमदनगर

कारागृहात कैद्याचा वाढदिवस…संगमनेरचे चार पोलीस कर्मचारी निलंबित

कारागृहात एका कैद्याचा वाढदिवस साजरा झाल्याची घटना उघडकीस आल्याने संगमनेरच्या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या चार पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखांनी हि आक्रमक कारवाई केली असून या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील कारागृहात काही दिवसांपूर्वी शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. करण्यात आला.

वाढदिवसासाठी केकही आणण्यात आला होता. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना समजताच त्यांची या घटनेची गंभीर दखल घेतली.

संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने कारवाई करत चार पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.

निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे यामध्ये संजय साबळे, रविंद्र कुलकर्णी (संगमनेर शहर पोलिस ठाणे), रामदास भांगरे (तालुका पोलीस ठाणे), आनंदा भांगरे (घारगाव पोलीस ठाणे) या चार जणांचा समावेश आहे. या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोरच कैद्यांना या वस्तू मिळतात. असे असतानाही संबंधित कर्मचार्‍यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button