अहमदनगर

खासगी बस- कारची समोरासमोर धडक; एक ठार

अहमदनगर – अहमदनगर- पाथर्डी महामार्गावरील कौडगाव (ता. नगर) शिवारात सोमवारी सायंकाळी खासगी बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत. अनिल दशरथ पालवे (वय ३८ रा. बाळेवाडी ता. नगर)असे मयताचे नाव आहे. जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे समजू शकली नाही.

अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिकांनी उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान यातील अनिल पालवे यांचा मृत्यू झाला. जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button