अहमदनगर

डीजे लावून मिरवणूक; सुमारे 20 जणांविरूध्द गुन्हा

वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांच्याबरोबर डीजे लावून मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या

सुमारे 20 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

19 मार्च, 2022 रोजी ही मिरवणूक काढण्यात आली होती. 19 मे, 2022 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार अर्ज आल्यानंतर चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींमध्ये सचिन विश्वनाथ चोरगे, कैलास एकनाथ अभंग, अशोक पांडुरंग पाथरकर, श्रीराम दशरथ वाकचौरे, बाबासाहेब किसन वाकडे, एकनाथ कारभारी शिंदे,

अर्जुन शंकर झनान, शंकर बबन जारडकर, गजानन हुलगुंडे, सतीश रघुनाथ चोळके, संजय मारुती घाडगे यांच्यासह अनोळखी पाच ते दहा जणांचा समावेश आहे.

वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर विजयी उमेदवारांच्याबरोबर डीजे सिस्टीम लावून फरहत हॉटेल ते एमएसईबी कार्यालयाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढली होती.

मिरवणुकीदरम्यान बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब शंकर काळे यांनी तक्रार अर्जाद्वारे 12 मे, 2022 रोजी कोतवाली पोलिसांकडे केली होती.

कोतवाली पोलिसांनी चौकशी करून जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button