अहमदनगर

दहीहंडी उत्सवात ‘यांना’ सहभागी होण्यास मनाई; जिल्हा पोलिसांचे निर्देश

अहमदनगर- येत्या काही दिवसात नगर शहरात होणार्‍या दहीहंडी उत्सव व वीर गोगादेव निशाण मिरवणुकीसंदर्भात मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पोलीस प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली. यावेळी विविध 18 मंडळे व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

दहीहंडी उत्सव व वीर गोगादेव निशाण मिरवणुकीत नियमांचे पालन करावे. 14 वर्षाखालील गोविंदांना सहभागी करता येणार नाही. डॉल्बी व डीजेला परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 

दहीहंडी उत्सवात डीजे, डॉल्बीला बंदी असणार आहे. गोविंदांच्या पथकात 14 वर्षाखालील युवकांना सहभागी होता येणार नाही. जास्तीत जास्त 18 फूट उंचीवर दहीहंडी बांधता येईल. त्यापेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधता येणार नाही. कार्यक्रम स्थळी रूग्णवाहिका व प्रथमोपचार सुविधा ठेवण्यात यावी. सर्व मंडळे व संघटनांनी रीतसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button