नोकरीच्या बहाण्याने परदेशी तरुणीकडून वेश्याव्यवसाय

पिंपरी चिंचवड : परदेशी तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात बोलावून घेतले. तरुणी भारतात आल्यानंतर तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.
याबाबत गुरुवारी (दि.१०) सांगवी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. प्रॉल्सी (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा येथील रहिवासी असलेली सध्या भारतात वास्तव्य करणारी आरोपी महिला प्रॉल्सी हिने फिर्यादी पीडित तरुणीला कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने भारतात बोलावले.
त्यानुसार पीडित तरुणी तिच्या देशातून २५ जानेवारी २०२० रोजी मुंबई विमानतळावर आली. तिथे आरोपी प्रॉल्सी हिने एका व्यक्तीला फिर्यादी यांना घेण्यासाठी पाठवले होते. त्या व्यक्तीसोबत फिर्यादी नवी सांगवी येथे आल्या. नवी सांगवी येथे आल्यानंतर प्रॉल्सी हिने फिर्यादी यांचा पासपोर्ट काढून घेतला होता.