अहमदनगरआरोग्यताज्या बातम्यासंगमनेर

मुलांना जपा; आता गालफुगीची साथ !

या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होतो. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. असा सल्ला संगमनेरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप होन यांनी दिला आहे.

गालफुगी म्हणजेच गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्ग आहे. तो पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होतो. ही लाळेची ग्रंथी आपल्या कानाच्या खाली व समोरील भागात असते.

या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होतो. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. असा सल्ला संगमनेरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप होन यांनी दिला आहे.

लसीकरण केले का ?

Advertisement

आजाराला प्रतिबंध करण्यासाठी एमएमआर ही लस बाळाला नवव्या आणि पंधराव्या महिन्यात देणे गरजेचे आहे लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. प्रत्येक पालकांनी त्यांच्या बालकांना बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘एमएमआरचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल ?

■ आजाराची लक्षणे दिसून येताच मुलांना एकमेकांच्या संपर्कात येऊ देऊ नये, हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना साधारण ८ दिवस शाळेत पाठवू नये. उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप आल्यानंतर पॅरासिटेमॉल हे औषध देऊन विश्रांतीची गरज असते. मुलांना आहारात द्रवपदार्थ द्यावेत. कोमट पाणी प्यायला द्यावे. चावायला लागणारे अन्न देणे टाळावे.

Advertisement

लक्षणे काय ?

लाळेच्या ग्रंथीला सूज येणे, ती सूज वेदनादायक असते. तसेच काहींना ताप, डोकेदुखी, थकवा, भूक मंदावणे, उलटी अशी लक्षणे जाणवतात. काहींना कमी- अधिक प्रमाणात त्रास होतो. अन्नाचे सेवन करताना त्रास होतो. एका बालकापासून इतरही बालकांना त्याचा संसर्ग होतो.

• गालफुगीचा त्रास होत असलेल्या मुलांना त्यांचे पालक रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन येत आहेत. हा आजार विषाणूमुळे होतो. बाळ ९ महिन्यांचे असताना पहिला डोस, तसेच दुसरा बूस्टर डोस बाळ १५ महिन्यांचे झाल्यानंतर देतात. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ही लस देणे अत्यावश्यक आहे. – डॉ. संदीप होन, बालरोगतज्ज्ञ, संगमनेर

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button