Thursday, May 30, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : मोफत दूधवाटप करून शासनाचा निषेध

Ahmednagar News : मोफत दूधवाटप करून शासनाचा निषेध

Ahmednagar News : दूध उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा जनसंघर्ष संघटनेच्या वतीने मोफत दूध वाटप करण्यात येऊन निषेध करण्यात आला.

जनसंघर्ष संघटनेने अकोल्यात दि. २३ ते २९ नोव्हेंबर २०२३ असे ७ दिवस अमरण उपोषण केले आणि लोणी तसेच संगमनेर येथे दोन वेळा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत बैठक केली.

बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार २० डिसेंबर रोजी अधिवेशनात ३.२/८.२ गुणवत्तेच्या दुधाला २९ रुपये बाजारभाव, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान अशी घोषणा केली, परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात दि. ४ जानेवारी रोजी परिपत्रक निघाले,

त्यात ३.५/८.५ दुधाला २७ रुपये भाव व अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना फक्त ३० दिवसांसाठी अशी घोषणा करण्यात आली, तसेच ज्या गायींना इअर टॅगिंग झालेले आहे, त्याच दुधाला अनुदान असाही आदेश करण्यात आला.

खरंतर राज्यात ४० टक्के गायींना आजही इअर टॅगिंग होणे बाकी आहे व हे करत असताना पशुवैद्यकीय विभागाकडे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तुटवडा आहे.

दूधविकास सचिव तुकाराम मुंडे यांनी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर्सचे सहकार्य घेणेही अमान्य केलेले आहे, अशा परिस्थितीत राज्यात फक्त ५० टक्के शेतकऱ्यांना हे तोंडाला पानं पुसणारं फसव अनुदान दिलं जात आहे.

दुधाला प्रतिलिटर २७ रुपये बाजारभाव करून उद्योजक लोकांचं कल्याण करणारा जुलमी निर्णय शासनाने घेतलेला आहे. पशुखाद्याचे भाव १८०० रुपये झालेले आहेत व त्याचेही भाव कमी करण्याचे धोरण शासन घेत नाही,

राज्यात ३० टक्के भेसळ दूध असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं वाटोळं होतंय तरीही सत्ताधारी तसेच शेतकरी शेतकऱ्यांचा विचार करते नाही, तसेच विरोधक कुठलीही तीव्र भूमिका मांडत नाही. हे शेतकरी बांधवांचे दुर्भाग्य आहे.

जनसंघर्ष संघटनेने काल शंभूराजे राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संघर्ष करण्याची भूमिका घेतली म्हणून प्रांत कार्यालयासमोर मोफत दूध वाटून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे, डॉ. मोहन पवार, तुषार पोटे, हृषीकेश गुंजाळ, तुळशीराम कातोरे, संदीप शेणकर, महेश सोनवणे, निलेश गवांदे,

नितीन डुंबरे, तुकाराम पाटोळे, मिलिंद नाईकवाडी, नानासाहेब धुमाळ, सागर बागे, ओमकार अस्वले, अहमद पठाण, सिद्धार्थ पाटणकर, रवींद्र वाणी, वाणी, संकेत घोडेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments