अहमदनगर

खोटे कागदपत्रे करून घराची खरेदी; एक जण गजाआड

अहमदनगर- मुलीच्या नावे असलेल्या घराचे आई व इतर तिघांनी खोटे कागदपत्रे तयार करून घराची परस्पर विक्री केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनुजा संजय बोरकर (काशिबाई शंकर कडेकर) रा. पौंड रस्ता, पुणे यांनी फिर्याद दिली आहेे.

 

या दाखल गुन्ह्यात लक्ष्मण विठ्ठल गुंड (वय 48 रा. माणिकनगर, नगर) याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याने घर खरेदी केेले होते.

 

या दाखल गुन्ह्यात फिर्यादीची आई कमलाबाई शंकर कडेकर, भावजयी सुषमा शामराव कडेकर (दोघी रा. आलमगीर, भिंगार), कुणाल मंत्री (रा. दौंड, पुणे), प्रिन्स हौसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापु देठे यांचा समावेश आहे. यातील सुषमा कडेकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

 

फिर्यादी यांचे भिस्तबाग चौक, सावेडी येथील रो.हौऊस क्र. 2 घेतले होते. 1991 रोजी फिर्यादी यांना घराचा ताबा मिळाला होता. दरम्यानच्या काळात प्रिंन्स सह गृहनिर्माण संस्था, सावेडीचे जागा मालक अल्ताफ शेख हे मयत झाल्याने जागेचे खरेदीखत होऊ शकले नाही.

 

दरम्यान फिर्यादी यांनी सदर घर विक्री करण्यासाठी काढले असता हे घर फिर्यादी यांची आई कमलाबाई शंकर कडेकर यांनी परस्पर लक्ष्मण विठ्ठल गुंड यांना विकले असल्याचे समोर आले. यानंतर फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button