अहमदनगर

सोनईतील पुष्पाला पोलिसांनी केले जेरबंद

मोटारसायकलवरुन चंदनाच्या लाकडांची वाहतूक करणार्‍या सोनईतील दोघांना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील एकनाथ ढोले यांनी फिर्याद दिली असून पोलीस ठाण्यात चंदन चोरी व अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 3 एप्रिल रोजी दुपाणी एक वाजता पानेगाव ते सोनई रोडवर चिमटा रोडवरील कॅनॉलच्या कडेला गणेश बाळू शिंदे (वय 29) रा. सोनई व माणिक राजाराम डुकरे (वय 40) रा. सोनई हे 40 हजार रुपये किंमतीची

चंदनाची लहान-मोठी 20 किलो वजनाची सुंगधी लाकडे एका गोणीत भरुन मोटारसायकलवरुन बेकायदेशीरपणे चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना आढळून आला.

यावेळी पोलिसांनी अंदाजे 40 हजार रुपये किमतीची चंदनाची 20 किलो लाकडे व 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. दाखल फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button