Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरसरकारला शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीचे प्रेम ...! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

सरकारला शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीचे प्रेम …! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

Ahmednagar News : केंद्रासह राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीच प्रेम दाखवत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात कांदा उत्पादन होत आहे.

मात्र सरकारने गेल्या वर्षी घोषणा करूनही अद्याप कांद्याला अनुदान मिळाले नाही. सरकारने कांदा निर्यातबंदी का केली.

सरकार दुटप्पीपणे शेतकऱ्यांना छळण्याचे आणि भाव पाडण्याच काम करतय अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित आयोजित जनाधिकार जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, प्रश्न सुटल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचे दिसले. यावेळी ना. दानवे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पोलखोल केल्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडले.

नागरिकांच्या समस्या, प्रश्नांबाबत संबंधित अधिकारी वर्गाशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वत: फोनवरून संवाद साधून त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तर काही नागरिकांना संबंधित समस्येसाठी शिफारस पत्र देण्यात आली असून तात्काळ ३९ प्रकरण निकाली काढण्यात यश आले.

श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संजय गांधी निराधार योजनेस पात्र असूनही वंचित असलेले नागरिक, धान्यापासून वंचित लाभार्थी, अपंगांच्या समस्या, भूमाफिया, महावितरणाचे प्रश्न,

घरकुल योजनेपासून वंचित नागरिक, रोजगार, शालेय पोषण आहार, अकोले येथील अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना निष्कृष्ट जेवण, सातबारा आदी विषय आले.

या जनता दरबारात आलेले विविध प्रश्न, समस्यांचा आपल्या कार्यालयातून पाठपुरावा होत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारने कोणतेही दिवे लावले नाही.

दिव्याखाली अंधार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. जनतेच्या जीवनात काही अंशी उजेड आणण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत असल्याचे ना. दानवे म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments