गोष्ट पैश्याची

PVR आणि INOX शेअरमध्ये 7 टक्क्यांपर्यंत उसळी; समोर आले मोठे कारण

मल्टिप्लेक्स कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. शुक्रवारी पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्सच्या (INOX) शेअरमध्ये उसळी दिसली.दरम्यान हे शेअर्स वधारण्याचे कारण RRR हा बिग बजेट चित्रपट असल्याचे मानले जात आहे.

शेअरची किंमत 25 महिन्यांच्या उच्चांकावर
आयनॉक्सचा स्टॉक शुक्रवारी 479 वर पोहोचला आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी 2020 रोजी या शेअरने या किमतीला टच केला होता.

पीव्हीआरचे शेअर्स 1,839 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी 28 फेब्रुवारी 2020 रोजी या स्टॉकची किंमत या पातळीवर पोहोचली होती.

शुक्रवारी 12:16 वाजता, PVR च्या शेअरची किंमत 4 टक्क्यांहून अधिक उसळीसह 1853.15 रुपयांवर व्यवहार करत होती. INOX च्या शेअरची किंमत 7 टक्क्यांहून अधिक वाढून 476.95 रुपयांवर होती.

गेल्या सहा सत्रांपैकी पाच सत्रांमध्ये आयनॉक्सचा शेअर वधारला आहे. या कालावधीत सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे.

या वर्षी आतापर्यंत स्टॉक 34 टक्क्यांनी वाढला आहे. 7 मार्चपासून PVR चा स्टॉक जवळपास 22 टक्क्यांनी वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत तो 41 टक्क्यांनी वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button