राहाता, संगमनेर, श्रीरामपूरचा घेतला आढावा ! राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले कार्यकत्यांनी केवळ…
कार्यकत्यांनी केवळ तक्रारी न करता काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कामात चुका जरूर दाखवा; पण कामच ठप्प होईल आशी भूमिका घेऊ नका, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Ahmednagar News : कामे सुरू असलेल्या गावात समन्वयाचा अभाव दिसतो. कोणा एकाच्या मालकीची योजना नाही, योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जशी सरकारी यंत्रणेची तशीच गामस्थांचीही आहे.
कार्यकत्यांनी केवळ तक्रारी न करता काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कामात चुका जरूर दाखवा; पण कामच ठप्प होईल आशी भूमिका घेऊ नका, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी माणिक आहेर, शैलेंद्र हिंगे, किरण सावंत पाटील यांच्यासह जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वी सर्व योजनांचा आढावा मंत्री विखे-पाटील यांनी घेतला होता. या बैठकीत योजनेच्या कामातील चुकांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात आशा सूचना दिल्या होत्या.
आजच्या बैठकीत मंत्री विखे यांनी यामध्ये झालेल्या दुरुस्तीचा आढावा घेऊन यामध्ये बदल न केलेल्या अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच ठेकेदार यांच्याकडून आढावा घेऊन पुन्हा एकत्रितपणे योजनेच्या कामातील चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिले.
२०२४ पर्यंत या योजनेचे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्याचा कालावधी लक्षात घेऊन योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी कर्मचारी यांना दिल्या
पुढील अनेक वर्षांचा पाणीप्रश्न या योजनेतून सुटणार आहे. त्यामुळे कामातील त्रुटी आत्ताच दूर करणे महत्त्वाचे ठरेल, कामातील चुका दुरुस्त न झाल्यास आणि पाण्याची उपलब्धता होवू न शकल्यास
निधीचा अपव्यय होईल हे गांभीर्य लक्षात घेऊन योजनेच्या कामासाठी तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी दर आठ दिवसाला एकत्रिपणे कामाचा आढावा घेण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सुचविले.