अहमदनगर

एलसीबीच्या सहा गावठी हातभट्टीवर धाडी; दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापेमारी सुरू केली आहे. तीन दिवसात नगर तालुका, भिंगार व पारनेर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या सहा हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकले.

यामध्ये गावठी हातभट्टीचे साधने व तयार दारूचा साठा असा एकुण एक लाख 37 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन महिला व चार पुरूष अशा सहा जणांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विक्रम लक्ष्मण पवार (वय 36 रा. नेप्ती ता. नगर), गणेश टिल्लू पवार (रा. पवार वस्ती, नेप्ती), विजय सुदाम गव्हाणे (रा. खारवाडी ता. पारनेर), बाजीराव शंकर गायकवाड (रा. पळशी ता. पारनेर) व दोन महिला (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द हे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारू निर्मिती करणार्‍यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके,

देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सचिन आडबल, लक्ष्मण खोकले, संभाजी कोतकर यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. या पथकाने शनिवार, 19 मार्च, 2022 ते सोमवार, 22 मार्च, 2022 या कालावधीत कारवाईची विशेष मोहिम राबवून सहा ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी दारू, कच्चे रसायन आदी साहित्य नष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button