टेक्नॉलॉजी

Railway Knowledge : तुम्हाला रेल्वे स्टेशनवर मोफत हाय-स्पीड इंटरनेट किती वेळ मिळते? जाणून घ्या मोबाईलला कनेक्ट करण्याची सोप्पी पद्धत

आजकाल इंटरनेटशिवाय कोणतीही गोष्ट शक्य राहिली नाही. कारण देशात सध्या सर्व गोष्टी या ऑनलाईनच्या माध्यमातून केल्या जातात.

Railway Knowledge : सध्याचे युग हे सर्व ऑनलाईन स्वरूपाचे होत आहे. कारण आता तुम्हाला कोणतेही काम जर सहज करायचे असेल तर तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ते सहज पूर्ण करू शकता.

अशा वेळी जेव्हा तुम्ही रेल्वने प्रवासात बाहेर जात असता तेव्हा तुम्हाला मनोरंजनासाठी किंवा महत्वाच्या कामांसाठी इंटरनेटची खूप गरज असते. अशा वेळी तुम्ही रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळवू शकता.

ही खास योजना रेल्वेची आहे. भारतीय रेल्वेची योजना देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे स्थानकांवर इंटरनेट उपलब्ध करून देण्याची आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कठोर परिश्रम घेत असलेल्या रेल्वेने आतापर्यंत 6108 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना इंटरनेट उपलब्ध करून दिले आहे.

यामध्ये विनाखर्च रेल्वे प्रवासी या इंटरनेटचा वापर करू शकतात. यामध्ये प्रवासी रेल्वे स्टेशनवर अर्धा तास मोफत हायस्पीड इंटरनेट वापरू शकतो. तसेच रेल्वे स्थानकांवर, रेल्वे कंपनी RailTel RailWire नावाने वाय-फाय इंटरनेट पुरवते.

तुम्ही रेल्वे स्टेशनवर दिवसातून 30 मिनिटे मोफत इंटरनेट वापरू शकता. हे वाय-फाय इंटरनेट स्पीड 1Mbps देते. 30 मिनिटांनंतर तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. Railwire चे इंटरनेट पॅक फक्त 10 रुपयांपासून सुरू होतात. 10 रुपयांमध्ये 34Mbps स्पीडवर 5GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. मात्र हे तुमच्यासाठी एका दिवसासाठीचे आहे.

वाय-फाय फक्त रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे.

दरम्यान, विनामूल्य वाय-फाय सेवा फक्त रेल्वे स्थानकावर वापरली जाऊ शकते. ट्रेनमध्ये प्रवास करताना Railwire इंटरनेट काम करत नाही. तुम्ही Railwire.co.in वर RailWire च्या इंटरनेट प्लॅनबद्दल माहिती मिळवू शकता. वाय-फाय प्लॅनच्या पेमेंटसाठी तुम्हाला नेटबँकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि UPI चा पर्याय मिळतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पेमेंट मोड निवडू शकता.

तुम्ही याप्रकारे फोन किंवा लॅपटॉप कनेक्ट करू शकता

– तुमच्या स्मार्टफोनवर वाय-फाय सेटिंग उघडा.
– वाय-फाय नेटवर्क शोधा.
– त्यानंतर railwire नेटवर्क निवडा.
– आता मोबाईल ब्राउझरवर railwire.co.in वेबपेज उघडा.
– तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर इथे टाका.
– आता तुमच्या नंबरवर OTP पाठवला जाईल.
– RailWire शी कनेक्ट करण्यासाठी हा OTP पासवर्ड म्हणून वापरा.
– ओटीपी टाकल्यानंतर इंटरनेट कनेक्ट होईल. आणि तुम्ही या फ्री इंटरनेटचा लाभ मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button