Railway Recruitment 2023 : लक्ष द्या ! 10वी पास असाल तर ‘या’ तारखेपासून रेल्वेमध्ये करा अर्ज, 3115 पदांवर मोठी भरती
तुम्ही 10 वी पास असाल तर तुम्ही रेल्वेमध्ये अर्ज करू शकता. कारण रेल्वेत 3115 पदांवर मोठी भरती होणार आहे.

Railway Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी मोठी भरती काढली आहे. या भरती अंतर्गत एकूण 3115 अर्ज मागवले आहेत.
यामध्ये पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर उमेदवार या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. रेल्वेच्या या भरतीमध्ये फिटर, वेल्डर, मेकॅनिक, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, लाईनमन, वायरमन, इलेक्ट्रिशियन इत्यादी पदांचा समावेश आहे.
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे ठेवण्यात आले आहे. तर OBC, EWS, SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल. उमेदवारांची गुणवत्ता यादी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या आधारे निवड केली जाईल.
अर्जासाठी पात्रता:
– उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
– संबंधित विषयात आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्जासाठी वयोमर्यादा काय आहे?
भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे ठेवण्यात आले आहे. तर OBC, EWS, SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.
तुम्हाला किती पगार मिळेल?
या नोकरीमीमध्ये उमेदवारांना दरमहा 7000 रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील.
अर्जासाठी शुल्क किती आहे?
सामान्य, OBC आणि EWS: रु 100 तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडी, महिलांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची गुणवत्ता यादी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या आधारे निवड केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
– अर्ज सुरू होण्याची तारीख: 26 सप्टेंबर 2023
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023
महत्त्वाची कागदपत्रे:
– आधार कार्ड
– जात प्रमाणपत्र
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– सक्रिय ईमेल आयडी
– मूळ पत्ता पुरावा
– मोबाईल नंबर
आवश्यक कागदपत्रे
– अर्जदाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी
– अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
– उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट https://er.indianrailways.gov.in/ वर जा.
– मुख्यपृष्ठावरील भरती लिंकवर क्लिक करा.
– आवश्यक तपशील टाकून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– अर्ज भरा आणि सबमिट करा.
– आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फी भरा.
– फॉर्म सबमिट करा आणि डाउनलोड करा.
– त्याची प्रिंट काढून ठेवा.